नाव- लतिका चौधरी
पत्ता- दोंडाइचा। ता.शिदखेड़ा जि. धुळे
भ्रमणध्वनी
शिक्षण- एम ए, बी एड इंग्लिश
व्यवसाय-
१) १२वी ते बी ए च्या कालावधीत ४ वर्ष लेडीज होस्टल सुपरिटेंडेंट
२) १९९३ ते ९६ सिनिअर कॉलेज प्रोफ़ेसर
३) २००० पर्यन्त इंग्लिश मिडियम मध्ये नोकरी
४) २००० ते आजतागायत माध्यमिक शाळा शिक्षिका
(आर.डी.एम पी.हायस्कूल,दोंडाइचा)
प्रकाशित पुस्तके-
१) २ अहिरानी काव्यसंग्रह
२) २ अहिरानी कादंबर्या
३) २ मराठी काव्यसंग्रह
४) १ मराठी कादम्बरी
५) १ ललित लेखन
६) १ वैचारीक लेखन
७) १ बालकाव्यसंग्रह
८) १ मराठी कथासंग्रह
प्राप्त पुरस्कार-
१) आदर्श शिक्षिका
२) प्रतिभारत्न
३) काव्यांजली
४) बहिणाबाई चौधरी......विविध ८ पुरस्कार
उल्लेखनिय-
धुळेआकाशवाणी
१) प्रबोधन लेखन
२) खांदेशी बावनकशी अहिरानी लेखन प्रक्षेपण
गझल
झाली सुखे कशी ही नावे मला कळेना
का गीत वेदनांचे गावे मला कळेना
माझ्या सभोवताली जोखड़ परंपरेचे
नभ गाठण्या कसे मी जावे मला कळेना
त्याची सुखे गुलाबी आभास होत गेली
का यातना शराबी भावे मला कळेना
आयुष्य वेचले मी घेऊन वीज हाती
अंधारल्या ढगांनी न्यावे मला कळेना?
सन्मान हार त्यांचे मंचावरी मिळाले
वस्तीत लांडग्यांचे चावे मला कळेना
मेंदूत माणसांच्या गर्दीत श्वापदांच्या
का माणसाळलेले छावे मला कळेना
गागालगा लगागा गागालगा लगागा
वृत्त-आनंदकंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा