नाव- रवींद्र गौतम कांबळे
पत्ता- उत्तमनगर, एन. डी. ए. रोड ,
ता.हवेली,जि.पुणे. पिन-४११०२३
भ्रमणध्वनी- ९११२१४३३६०
व्हाट्स अॅप- ९९७०२९१२१२
ईमेल- Ravikamble612@gmail.com
शिक्षण- बि. कॉम ( प्रथम वर्ष )
व्यवसाय- नोकरी(ग्रामपंचायत)
प्रकाशित पुस्तके
"काव्यभान" कविता संग्रह लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर.
प्राप्त पुरस्कार
श्रावणबाळ काव्यगौरव पुरस्कार(इंदापूर)
गझल १
मागतो संवाद आता
टाळतो मी वाद आता!
माणसांच्या अंतराला
घालतो मी साद आता!
मीच घेतो पाय मागे
होवुनी बर्बाद आता.!
बेसुरील्या जिंदगीचा
शोधतो मी नाद आता!
मानतो ना धर्म जाती
राहतो निर्वाद आता.!
पांगलेल्या माणसांना
जोडतो आल्हाद आता!
गा ल गा गा गा ल गा गा
वृत्त- मनोरमा
गझल २
झाडे चहूकडे पण, छाया कुठेच नाही
नातीच खूप आहे, माया कुठेच नाही.!
बाजार भामट्यांचा,यात्रा जशी भरावी
ज्योती समान आता,काया कुठेच नाही
आब्रूस राखनारी, देते सती परीक्षा
न्यायात ठेवणारा, राया कुठेच नाही.!
प्रेमात माणसाची, का जात आड येते
निर्वाद संस्कृतीचा, पाया कुठेच नाही.!
घेवून शिक्षणाला, संस्कार पाळणारा
जाणार तो कधीही,वाया कुठेच नाही!
गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा
वृत्त- आनंदकंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा