नाव- संदिप कळंबे
पत्ता- रूम नं. १४, चाळ नं. ४, नुरूद्दीन चाळ,
गाव देवी रोड, बिहारी टेकडी, पोयसर, कांदिवली पुर्व,
मुंबई ४००१०१
भ्रमणध्वनी- ९८९२८८०२७७
इमेल- kalambesandip1980@gmail.com
शिक्षण- बी.कॉम ( तृतिय वर्ष )
गझल १
एवढाही बदल कसा झाला
कासवा सारखा ससा झाला
हाव नव्हती तुला कश्याची तर
मग उथळ का तुझा पसा झाला?
जाहली धाव धाव गर्भातच
जन्म नंतर कसाबसा झाला
देश होता तसाच बघ आहे ?
बदल नाहीच फारसा झाला
श्वास रोखून चाललो होतो
फूल दिसले नि हादसा झाला
गा ल गा गा ल गा ल गा गा गा
वृत्त - लज्जिता
गझल २
पावले माझी जरी चुकतात हल्ली
रोज वाटा वेगळ्या कळतात हल्ली
मी उन्हाला टाळताना एक कळले
सावल्याही येथल्या डसतात हल्ली
एवढे तरबेज........ केले निंदकांनी
हासतो मी आणि ते चिडतात हल्ली
भेटतो जो तो इथे धोकाच देतो
भाव खोट्यांचे कुणा दिसतात हल्ली
रे खरोखर कोण तो बोलून गेला
आपल्यावर आपले जळतात हल्ली
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
वृत्त: मंजुघोषा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा