नाव- वसंत जगन्नाथ शिंदे.
पत्ता- २१, मोळाचा ओढा, शिंदे काॅर्नर, सातारा.
भ्रमणध्वणी- ९८२२६५३५८२
इमेल- shindefurniture123@gmail.com
शिक्षण- एम. ए. ( हिंदी )
प्रकाशित पुस्तके-
वसंत बहार काव्य संग्रह
इंद्रधनू प्रतिनिधीक काव्य संग्रह
आकाश पांघरताना काव्य संग्रह
पुरस्कार- अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.
भुषवलेली पदे
अध्यक्ष - साधना साहित्यिक व सांस्कृतिक मंच.
गझल
माणुसकीचा गळा घोटला धर्माने या
विश्वाचा फाटला नकाशा युध्दाने या
फुल म्हणून मी आलो होतो जगात या पण
कुपीत माझे अत्तर केले गंधाने या
रे काळजाला भोक पाडण्या आधीच कसा
पाठीवरती प्रहार केला शब्दाने या
मुलगी होते म्हणून बहुधा असेल घडले
जन्माआधी सूड उगवला जन्माने या
नशेत होतो ... होतो धुंदीत यौवनाच्या
सावध केले ... हुशार केले वृध्दाने या
केले नसते प्रवृत्त जर ते टळले असते
भाग पाडले युद्ध कराया कृष्णाने या
होतो मीही रानटी आणि अविचारीही
मला घडवले .. माणूस केले बुध्दाने या
वृत्त - कल्याण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा