बुधवार, २७ जुलै, २०१६





नाव- प्रतिभा सराफ 

पत्ता- इ- १५०३, १५वा मजला,
रूणवाल सेंटर, गोवंडी स्टेशन रोड,
देवनार, मुंबई ४०००००८

भ्रमणध्वनी- ९८३३०५६७९५, ९८९२५३२७९५

इमेल- 

शिक्षण- एम. एस्सी बी. एड

व्यवसाय- व्याख्याती आचार्य आणि मराठे काॅलेज, मुंबई 

प्रकाशित पुस्तके- 
मात्र एक नाही ( काव्यसंग्रह ) जुलै २००३
मातीत पूर्णत्वानं रूजण्यापूर्वी ( काव्यसंग्रह ) सप्टेबंर २००६
दु:ख माझे कोवळे ( गझल संग्रह ) एप्रिल २०१३
सलग पाच दिवस ( कथा संग्रह ) जानेवारी २०१४
माझं कुणीतरी ( ललित लेख संग्रह ) जानेवारी २०१४

प्राप्त पुरस्कार- 
मुंबई मराठी साहित्य संघाचा ' आश्वासक साहित्यिक पुरस्कार 
मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा 'वृत्तपत्र लेखन विशेष उल्लेखनिय पुरस्कार 
अनेक कथा, कविता, लेखांना विविध पुरस्कार 
मात्र एक नाही या काव्यसंग्रहाला तीन पुरस्कार 
मातीत पूर्णत्वानं रूजण्यापूर्वी या काव्यसंग्रहाला दहा पुरस्कार 
सलग पाच दिवस कथा संग्रहाला दोन पुरस्कार 

उल्लेखनिय कार्य- 
अ.भा.सा.समेलनात सहभाग 
आकाशवाणी, दूरदर्शन आणि अनेक संस्थामधुन विविध कार्यक्रम सादर.
' मी प्रतिभा , माझी प्रतिभा ' हा स्वरचीत कवितांवर आधारित एक तासाचा कार्यक्रम 



गझल १

कशाला नटावे ? कशाला सजावे?
शरीरापुढेही मला तू पहावे. 

गवसले तुझ्यातच उद्याचे किनारे 
जहाजास माझ्या पुढे वल्हवावे.

दिखावा नि ताठा फुकाचाच माझा 
तुझा स्पर्श होता पुन्हा विर्घळावे.

जगाच्या गुन्हाची सजा दे मला तू 
गजाआडुनी पण...मला तू दिसावे 

तुझी साथ नसता गझल पांघरावी 
गझलनेच आता मला थोपटावे 

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा 
वृत्त- भुजंगप्रयात 



गझल २

इथे मी आडवाटेला जरासा थांब ना थोडा 
नव्याने वाट शोधूया जरासा थांब ना थोडा 

मुक्याने बोलल्या होत्या तुझ्या-माझ्यातल्या ओळी 
पुन्हा ऐकाव जुन्या कविता, जरासा थांब ना थोडा 

फुलांनी फेर धरला अन् कळ्याही लागल्या नाचू 
तुला सांगे ऋतू-हिरवा, जरासा थांब ना थोडा 

दवाचा थेंब झरताना भिजाव्या पापण्या माझ्या 
शहारा लाजरा टिपण्या... जरासा थांब ना थोडा 

हवा आधार प्रेमाचा जिवाची काहिली होता
उतारा फक्त स्पर्शाचा, जरासा थांब ना थोडा.

ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा 
वृत्त- वियदगंगा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: