नाव :- विद्या बनाफर
पत्ता :- अकोला
भ्रमणध्वनी :- ९४२२८६२२०९
इमेल :- Vieedyaa@gmail.com
शिक्षण :- एम ए बी एड.
व्यवसाय :- जि प शाळेत शिक्षिका
प्रकाशित पुस्तके :- माझ्या आकाशातील रंग
प्राप्त पुरस्कार :-
आंबेडकर फुले अकादमी चा काव्यसाधना पुरस्कार
चंद्रपूर शिक्षक साहित्य संस्थेचा
महाराष्ट्र गौरव पुरस्कार
उल्लेखनिय कार्य :-
अनेक साहित्य संमेलनात सहभाग
काव्यवाचन ,गझलवाचन
गझल -
१)
वेदनांना डोइवरती माळ तू
भावनांना वेदिवरती जाळ तू
व्यर्थ का जाळे जीवाची वात ही
चाळणीतून दुख सारे गाळ तू
सत्य ही विकतात येथे माणसे
त्याच बाजारात जाणे टाळ तू
फोडुनी छाती तमाची या इथे
वंचितांच्या वेदनेसी भाळ तू
पेटलेले वासनेने देह हे
चालताना तोल तो सांभाळ तू
चाटती लोणी कलेवर जाळता
झुंजुनी हो आज त्यांचा काळ तू
गाव कवितेचा भिजाया आज हा
शब्द दे हो नांगराचा फाळ तू
नाचण्या छातीवरी काळोखच्या
बांध वीजेचेच पायी चाळ तू
वृत्त- मेनका
२)
बाटलेल्या सावल्यांचे रंग होते ते
छाटलेले माणसांचे पंख होते ते
वाटुनीया घेतले ज्यांनी मला येथे
येथल्या पारंपरांचे शंख होते ते
सोसुनी चटके उन्हाचे तापले येथे
जागतिक त्या नायकांचे मंच होते ते
कापुनी गर्भात फांद्या ढेकरी दिधल्या
माय सावित्री कुळाचे वंश होते ते
चंद्रमौळी झोपड्या उध्वस्त ज्या केल्या
दीनतेच्या वारसांचे अंश होते ते
चाटुनी लोणी कलेवर सोडुनी गेरे
वासनालंपट खरे मतिमंद होते ते
पाचवीला पुजले दहशतीतले जीणे
वांझ इथल्या संस्कृती चे बंध होते ते
ठरवुनी चौकट कुणाची येथले नेते
लावुनी ताळे इथे स्वच्छंद होते ते
मर्द म्हणुनी गौरविले कारणाविण ज्या
कृष्णकृत्यांचे विकारी षंढ होते ते
लाटुनी वाटा कुणाचा जाहले तृप्त
चारचौघांच्यात जातीवंत होते ते
सुबक मुखडे घालुनी जे मोकळे फिरती
साचल्या पाण्यापरी पण संथ होते ते
देखणे ते रूप ज्यांचे नित्य आभासी
जातिवंत कोबर्याचे दंश होते ते
वृत्त -कादंबरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा