नाव :- प्रभा सोनवणे
पत्ता :- "सोनवणे हाऊस"
348 सोमवार पेठ
पंधरा ऑगस्ट चौक
सोमवार पेठ पुणे 411011
(विश्वेश्वर बँकेसमोर )
भ्रमणध्वनी :- ९२७०७२९५०३
इमेल :- sonawane.prabha@gmail.com
शिक्षण :- एम.ए
प्रकाशित पुस्तके :-
अनिकेत
जाईजुई
मृगचांदणी हे कविता संग्रह प्रकाशित !
प्राप्त पुरस्कार :- १९९५ चा गझलगौरव पुरस्कार प्राप्त !
काव्यक्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त !
भुषविलेली पदे :-
अध्यक्ष- काव्यशिल्प पुणे २००६-०७
कार्याध्यक्ष- रंगत संगत प्रतिष्ठान (काव्य विभाग )
संपादक - अभिमानश्री
दिवाळी अंक
कार्यकारी संपादक -फिरकी दिवाळी अंक
उल्लेखनिय कार्य :- महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ही कवितेच्या प्रसार व प्रचारासाठी यशस्वी दौरे केले.
१९९३ पासून गजल लेखन गजलनवाज भिमराव पांचाळे यांच्या गजलसंमेलनात सहभाग सुरेश भटांनंतर ची मराठी गजल या पुस्तकात गजल प्रकाशित.
गझल -
मला सांगायचे आहे जरासे
इथे थांबायचे आहे जरासे
किती दुष्काळ सोसावा धरेने
अता बरसायचे आहे जरासे
नदीला पूर आल्याचे कळाले
तिला उसळायचे आहे जरासे
कधी बेधुंद जगताना मलाही
जगा विसरायचे आहे जरासे
मिळे सन्मान शब्दांना स्वतःच्या
तिथे मिरवायचे आहे जरासे
मला या वेढती लाटा सुनामी
मरण टाळायचे आहे जरासे
वृत्त - मृगाक्षी
ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
रविवार, १ जानेवारी, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा