रविवार, १ जानेवारी, २०१७

नाव :- महेन महाजन

पत्ता :- महेन महाजन
            'सहवास'
   मु.पो.आंजी (मोठी) जि. वर्धा

भ्रमणध्वनी :- ९७३०९६२९०१

इमेल :- mahenmahajan29@gmail.com

शिक्षण :-  एम.ए. (मराठी वाडःमय)

व्यवसाय :- व्यापार  (शीतपेय वितरक )

उल्लेखनिय कार्य :- बहुतांश नामांकित वर्तमान पत्रात, मासिके आणि दिवाळी अंकात गझल रचना प्रकाशित.
गझल मैफिलीत गझल गायन.
बर्‍याच दर्जेदार मुशायर्यात कवी संमेलनात गझलेचे सादरीकरण.



गझल -
१)
माझा जगावयाचा साधाच बेत आहे..!
मरणाकडे परंतू आयुष्य नेत आहे..!

मातीत पेरलेले दाणे गहाण माझे..,
वादात वाटणीच्या कोर्टात शेत आहे..!

आजन्म तुडविलेरे ज्यांनी कळ्या फुलांना..,
त्यांनाच पुष्पगुच्छे सरकार देत आहे..!

आपापल्या ठिकाणी सारेच भ्रष्ट जंतू..,
आडून देत आहे चोरून घेत आहे..!

पैशाविणा इथे मी आहे जरी भिकारी..,
पोटातल्या भुकेला म्हणतो मजेत आहे..!

आहे मला भरोसा बदलेल विश्व सारे..,
लाटा नव्या युगाच्या वेगात येत आहे..!

वृत्त - आनंदकंद,
लगावली -- गागाल गालगागा, गागाल गालगागा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: